आरोग्य शिबिरात देवदूतांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य शिबिरात देवदूतांचा सन्मान
आरोग्य शिबिरात देवदूतांचा सन्मान

आरोग्य शिबिरात देवदूतांचा सन्मान

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ ः मुंबईतील जी साऊथ वॉर्ड व्यापारी असोसिएशनतर्फे आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि शिवशाहू प्रतिष्ठान यांच्या विशेष सहकार्याने लोअर परळ येथील ना. म. जोशी महापालिका शाळा येथे रविवारी (ता. २६) मोफत महाआरोग्य शिबिर पार पडले. या उपक्रमादरम्‍यान मुंबई शहरात वेळोवेळी आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन करून मुंबई शहराला वर्षाला अडीच लाख रक्त पिशव्यांचे वाटप करणाऱ्यांचा सन्‍मान केला गेला.
आरोग्‍य शिबिरात जवळपास दीड हजारांहून अधिक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. विभागातील शालेय विद्यार्थ्यांची संख्या या वेळी लक्षणीय होती. विविध क्षेत्रांतील नामवंत व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी पार पडली. गरजेनुसार मोफत औषधोपचार, शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास योग्य सल्ला व तपासणीमध्ये ज्यांना नुकतीच नंबरची सुरुवात झाली आहे अशा ५०० रुग्णांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्य तपासणीसाठी सहभागी सर्व शालेय विद्यार्थ्यांना डेसिमल फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने भेटवस्तू व पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात विविध राजकीय पक्षांचे नेते, वृत्तपत्र समूहाचे प्रतिनिधी, वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी, संस्था, मंडळांचे पदाधिकारी व विभागातील समाजसेवक तसेच विविध मान्यवरांनी भेटी देत या शिबिराच्‍या आयोजनाबद्दल तिन्ही संस्थांचे पदाधिकारी यांचे कौतुक केले. या वेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या व आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विश्वस्त जीवन भोसले यांनी मानले.

यांचा झाला सन्‍मान
कांतिलाल पवार (नायर रुग्णालय), मंगल शिंदे (वाडिया रुग्णालय), कविता ससाने (के.ई.एम. रुग्णालय), सचिन गोसावी (जसलोक रुग्णालय), सुनीता गमिंडी (सायन रुग्णालय), अश्विनी लोहार शिंदे (राजवाडी रुग्णालय), पूजा लोटलेकर (सेवन हिल्स रुग्णालय), दीपक सोनावणे (कामा रुग्णालय), सरिता खेरवासिया (एन.एम.एम.सी. रुग्णालय), सागर कोळी (ब्रीच कँडी रुग्णालय), रामदास उनाडेकर (वाडिया रुग्णालय), संजय विश्वकर्मा (एस.आर.सी.सी. चिल्ड्रन रुग्णालय) व सविता नितनवरे (के.ई.एम. रुग्णालय) यांचा (ब्लड बँकेचे प्रमुख) सन्मान बाजीरावशेठ दांगट यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी दीपक शिंदे, नीलेश सावला, रवींद्र देसाई, मेहुल धरोड, राजू येरुडकर, कुवरजी छेडा, कृष्णा पाटील, धीरज कोठारी, नितीन गाला, जीतू परमार, प्रीतेश सावला, संतोष वर्टेकर, प्रकाश कानडे व अजय उतेकर उपस्थित होते.