Tue, March 28, 2023

संत गार्सिया महाविद्यालयात ‘नवे जग, नवी कविता’ उपक्रम
संत गार्सिया महाविद्यालयात ‘नवे जग, नवी कविता’ उपक्रम
Published on : 28 February 2023, 1:04 am
वसई, ता. २८ (बातमीदार) भाषा माणसाला जिवंत ठेवत असते, आधार देते. मराठी ही आपली मातृभाषा जी वारसाने आपल्या आईकडून आली. आईशी जे जे संबधीत आहे ते ते मौल्यवान असते. भाषेमुळेच आपल्याला अस्तित्व आहे, ओळख आहे. भाषेमुळेच आपण संवेदनशील असतो. कारण भाषेबरोबर विचार आणि संस्कृती येत असते, असे प्रतिपादन साहित्यिक सायमन मार्टीन यांनी केले. वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘नवे जग, नवी कविता’ हा कार्यक्रम सादर केला. या वेळी रितीका घरत, स्टेफी बेंडाचे, शालिनी बारी, मृणाली गावणंग, काजल कनोजिया, साक्षी मोरे, कँरिस्टा थाटू, दिशा पुजारी, साक्षी पाथरकर या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या.