सायकल राईडमधून प्लास्टिकमुक्तीचा संदेश

सायकल राईडमधून प्लास्टिकमुक्तीचा संदेश

कासा, ता. २ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील बोईसर फ्लायर या सायकलिंग ग्रुपद्वारे सायकल संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनाला पालघर, बोईसर, डहाणू परिसरातून सायकलप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सुमारे ५२ सायकलपटूंनी यात सहभाग घेतला होता. या संमेलनाच्या माध्यमातून या ग्रुपने प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण तसेच आरोग्य वाहतूक सुरक्षेविषयी संदेश दिला. यापुढे सायकल राईडच्या माध्यमातून समाजाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. संमेलनाचे आयोजन आकाश रुपटक्के, विशाल राऊत, सरिता जारोली, जयेश पिंपळे, आर्यन शुक्ला, आदित्य आपटे यांनी केले होते. संमेलनासाठी मिथुन पागधरे, संतोष देशमुख, डॉ. माने, डॉ. नेवगे यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com