दर्शन सोळंकीच्या आत्महत्येच्या तपासासाठी एसआयटी
मुंबई, ता. २८ : आयआयटी मुंबईतील १८ वर्षीय दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी या प्रकरणाचा पुन्हा तपास करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
आयआयटीत बी-टेकचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकीने १२ फेब्रुवारीला वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. एसआयटी दर्शनचे पालक, आयआयटी संस्थेचे अधिकारी आणि घटनेचे साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवणार आहेत. दर्शनला जातीय भेदभावाचा सामना करावा लागल्याच्या विविध विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी एसआयटी करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.