भांडुप परिसरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुप परिसरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद
भांडुप परिसरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद

भांडुप परिसरात आज, उद्या पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

भांडुप, ता. १ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम क्वारी रोड परिसरात मागील वर्षभरात क्वारी रोडवरील ९०० मिमी मुख्य जीआरपी जलवाहिनी वारंवार फुटल्यामुळे भांडुपकरांचे पाण्याविना प्रचंड हाल झाले होते. मुंबई महापालिका २ मार्चपासून एस विभागातील क्वारी रोडवरील १२०० मिलिमीटर आणि ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी २ मार्चला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी ३ मार्चला मध्यरात्री १२ पर्यंत भांडुप एस विभाग आणि एन विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांना या कालावधीत आवश्यक पाण्याचा साठा करून पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद असलेली ठिकाणे
भांडुप एस वॉर्डमधील प्रतापनगर, कोकणनगर, समर्थनगर, मुथू कम्पाऊंड, सोनापूर, लेक रोड, सुभाषनगर, गावदेवी मार्ग, भट्टीपाडा मार्ग, सर्वोदयनगर, जंगलमगल मार्ग, जनता बाजार, ईश्वरनगर, टॅंक रोड राजदीपनगर, उषानगर, नरदास नगर, भांडुप व्हिलेज रस्ता, कांजूरमार्ग एल बी एस परिसर.

विक्रोळी एन वार्ड विभागातील विक्रोळी पश्चिम, रेल्‍वे स्थानक परिसर, लालबहादूर शास्त्री मार्ग, पार्क साईट, लोअर डेपो पाडा, सागरनगर व विक्रोळीमधील काही परिसर.