भिवंडी महापालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी महापालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक
भिवंडी महापालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

भिवंडी महापालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

sakal_logo
By

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि एक लाख रुपयांची रक्कम भिवंडी महापालिकेस जाहीर झाली. साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा गौरवदिनी मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्‍या हस्ते हे पारितोषिक प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी स्वीकारले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी सुनील झळके हे उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये भिवंडी महापालिकेस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.