८१९ रुपयांसाठी एक लाखांचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

८१९ रुपयांसाठी एक लाखांचा फटका
८१९ रुपयांसाठी एक लाखांचा फटका

८१९ रुपयांसाठी एक लाखांचा फटका

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : ओला कारची दुप्पट गेलेली भाड्याची रक्कम परत मिळवण्याच्या नादात एका तरुणीने एक लाख ४ हजार रुपये गमावल्याची घटना कोपरखैरणेमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ऐरोलीतील एका आयटी कंपनीत कामाला असलेली तरुणी बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क येथे फिरण्यासाठी गेली होती. घरी परतत असताना या तरुणीने ओला कार बुक केली होती. ओला कारचे ८१९ रुपये झालेले भाडे तरुणीने गुगल पेद्वारे केले; मात्र पैसे मिळाले नसल्याने पुन्हा ओला कंपनीला ८१९ रुपये पाठवले होते; मात्र घरी गेल्यानंतर तिच्या खात्यातून ८१९ रुपये दोन वेळा गेल्याचा संदेश आल्याने तरुणीने आधी गेलेले ८१९ रुपये परत मिळवण्यासाठी गुगलवरून ओला कंपनीच्या कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधला होता; मात्र हा नंबर सायबर चोरट्यांचा असल्याने त्यांनी एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगत काही मिनिटांमध्ये एक लाखांहून अधिक रक्कम चोरी केली आहे.