
मध्य, हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ५ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर; तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालिन ब्लॉक घेण्यात येणार असून, रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्व -
कुठे - ठाणे ते कल्याण अप-डाऊन, पाचवी-सहावी मार्गिका
कधी - सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत
परिणाम - ब्लॉकदरम्यान ट्रेन क्र. १२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याणमार्गे वळवली जाणार आहे. तसेच
सर्व अप-डाऊन मार्गावर मेल एक्सप्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आणि वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिरा पोहोचतील. वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता दिव्यासाठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवाऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी ११.४५ वाजता सुटेल.
हार्बर रेल्वे
कुठे - कुर्ला-वाशी, अप आणि डाऊन मार्ग
कधी - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या लोकल आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
कुठे - बोरिवली ते भाईंदर, अप-डाऊन जलद मार्ग
कधी - शनिवारी रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ पर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विरार ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द तर काही अंशतः रद्द राहतील. रविवारी दिवसा कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.