Tue, March 28, 2023

विक्रमगड तालुक्यात महास्वच्छता मोहीम
विक्रमगड तालुक्यात महास्वच्छता मोहीम
Published on : 4 March 2023, 9:45 am
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड, अलोंडा, मलवाडा, टेंभुर्णीमधील २७४ श्री सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी विक्रमगड शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस ठाणे, नगर पंचायत कार्यालय आदी शासकीय कार्यालयातील सर्व परिसराची, रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता करून प्लास्टिक, गवत, टाकाऊ कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रसंगी तहसीलदार चारुशीला पवार, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.