Wed, March 22, 2023

संकल्प इन्स्टिट्यूटतर्फे मोफत संगणक अभ्यासक्रम
संकल्प इन्स्टिट्यूटतर्फे मोफत संगणक अभ्यासक्रम
Published on : 4 March 2023, 9:42 am
दिवा, ता. ४ (बातमीदार) : दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेनंतर पुढे काय, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांला पडतो. मागास, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना पैशाअभावी संगणकाचे ज्ञान घेता येत नाही. यासाठी संकल्प कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या सुनील गवळी यांनी संगणक अभ्यासक्रम मोफत शिकवण्याचे जाहीर केले आहे. केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक महिला दिनानिमित्त संकल्प कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटतर्फे मोफत संगणक बेसीक कोर्स गरजू, गरिब विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला आहे.