
‘आशिहारा’च्या वार्षिक स्पर्धेचा समारोप
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः आशिहरा कराटे इंटरनॅशनल यांनी वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलुंड येथील लायन्स क्लब ग्राऊंड येथे प्रशिक्षक दयाशंकर पाल यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या स्पर्धेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबूलाल सिंग उपस्थित होते. या स्पर्धेत ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आर्या आव्हाड, संजना गुगळे, अह्यान अहमद, मोनू मन्सुरी या चार विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले. या वेळी योगामध्ये विश्वविक्रम करणारी सोनम केवतही उपस्थित होती. इतर विद्यार्थ्यांना ब्राऊन, हिरवा, पिवळा, पांढरा पट्टा विविध श्रेणींमध्ये देण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजित यादव, सौरभ गुप्ता, नयना पाटील, विश्वास पाल, रिद्धी वाघमारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पालक वर्गांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.