Mon, March 20, 2023

वृषाली महिला संस्थेचा मेळावा जल्लोषात
वृषाली महिला संस्थेचा मेळावा जल्लोषात
Published on : 7 March 2023, 11:08 am
शहापूर, ता. ७ (बातमीदार) : वृषाली महिला सामाजिक संस्थेतर्फे महिला जागतिक दिनानिमित्ताने येथील वैश्य समाज हॉलमध्ये मेळावा पार पडला. या वेळी सर्व समाजातील महिलांनी सामूहिक नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत भरली. कधीही व्यासपीठावर न गेलेल्या ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना प्रोत्साहित करून त्यांना नृत्य शिकवू त्यांचे सादरीकरण केले जाते. आटगाव येथील महिलांच्या दिंडी सोहळ्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या वेळी काशीनाथ तिवरे, विनायक सापळे, करण भोईर, विशाल वताडी, प्रियांका बरोरा, डॉ. सत्यवती सपाटे, रंजनाताई उघडा, रजनी शिंदे, पुष्पा ठाकूर, कमल भोईर, पूनम चंदे, ज्योती शेखावत, अनिता झोपे, नीलम चंदे, विजया चव्हाण, वनिता भोईर, योगिनी झारघडे आदी उपस्थित होते.