मुंबई, नागपूरमध्ये छापेमारी

मुंबई, नागपूरमध्ये छापेमारी

मुंबई, ता. ७ : सक्तवसुली संचालनालयाने मुंबई आणि नागपूरमधील विविध १५ ठिकाणांवर सोमवारी छापेमारी करत दागिन्यांसह कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. गुंतवणूक घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नागपूर येथील पंकज मेहाडिया याने १२ टक्के व्याजाचे प्रलोभन दाखवत अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मेहाडियासह त्याची वृद्ध आई प्रेमलता मेहाडिया, लोकेश आणि कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद केयाल यांच्याविरोधात यापूर्वी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संबंधित मुंबई, नागपूरमधील १५ ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यात ५.५१ कोटी रुपयांचे दागिने आणि १.२१ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ईडीने जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com