
रोहयोतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) : रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचा सन्मान सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार आशिष जैस्वाल, आमदार महेंद्र दळवी, रोजगार हमी योजन व इतर बहुजन मागासवर्गीय विभागचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, रोजगार हमी योजनेचे आयुक्त शांतनू गोयल, रोहयो उपसचिव संजना खोपडे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, रोहयोचे राज्य समन्वयक नीलेश घुगे, सीएफपीचे राज्य समन्वयक सुमित गोरले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विक्रमगडचे गटविकास अधिकारी हनुमंत दोडके, रोजगार हमी योजनेचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब गायकवाड, कर्मचारी अजित गोरे, सिद्धेश आळशी, डोल्हारी बु.चे सरपंच विलास गहला, ग्रामसेवक शेलार, ग्रामरोजगार सेवक बाळा भेसरा यांचाही सन्मान करण्यात आला.