प्लास्टिक बंदीला पनवेलमध्ये हरताळ

प्लास्टिक बंदीला पनवेलमध्ये हरताळ

नवीन पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करूनही यंदाही पनवेल महापालिका क्षेत्रात प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. निर्बंध असूनही शहरात रंग व होळीचे सामान विकणाऱ्या दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशव्यांची सर्रासपणे विक्री केली असल्याने प्लास्टिकबंदीला पनवेलमध्ये हरताळ फासल्याचे चित्र आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकमुक्तीसाठी अहोरात्र जनजागृती केली जात होती, परंतु मध्यंतरीच्या काळात मात्र ही चळवळ थंडावल्याचे चित्र आहे. पनवेल पालिका क्षेत्रात सरसकट प्लास्टिकचा वापर वाढला आहे. पालिकेकडून प्लास्टिकबंदीचा दावा केला जात आहे. तसेच सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्यासाठी नागरिकांना सांगितले जात असताना दुसरीकडे होळीच्या निमित्ताने गल्लीबोळात प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सध्या प्रतिबंधित प्लास्टिकचा खच पडला असल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी गटारे तुंबण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे प्लास्टिकबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न तोकडे पडल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.
-----------------------------
बंदी फोल ठरल्याचे चित्र
कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल, खारघर व पनवेल महापालिकेच्या ग्रामीण भागातही प्लास्टिक पिशव्यांची विक्री होताना दिसत आहे. विशेषतः लहान मोठ्या टपऱ्या, झोपडपट्टीलगतची दुकाने, हातगाडीवरचे विक्रेते यांच्याकडे हमखास अशा प्रकारच्या पिशव्या विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामुळे पनवेल परिसरामध्ये प्लास्टिकबंदी फोल ठरल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com