ठाण्यात स्त्रीशक्तीचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात स्त्रीशक्तीचा जागर
ठाण्यात स्त्रीशक्तीचा जागर

ठाण्यात स्त्रीशक्तीचा जागर

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : नाईट रॅली, संगीत संध्या, वुमेन्स झोन, महिलांना रोजगारासाठी मोफत शिवणयंत्र वाटप, महिलांचा सन्मान अशा विविध कार्यक्रमाची पर्वणी ठाणेकरांना महिला दिनानिमित्त बुधवारी (ता. ८) अनुभवास मिळाली. विविध संस्थेच्या, विविध पक्षाच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव आणि सन्मान आदींच्या कार्यक्रमाची मांदियाळी ठाण्यात बुधवारी पाहायला मिळाली.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानातून ठाणे शहरातील विधवा महिलांना शिवणयंत्र प्रशिक्षण देण्यात आले. त्या महिलांना महिला दिनानिमित्त मोफत शिवण यंत्र वाटप करण्यात आले.
प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करून महिला रुग्णांना फळवाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. परबवाडी येथील जागृती मैदान येथून खास महिलांसाठी बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीत महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. तर महिला दिनाची सांगता सुरेल संगीत संध्येने करण्यात आली. याच कार्यक्रमाच्या दरम्यान मात्र तीन हात नाका येथील टिप टॉप येथे प्रभाग क्रमांक १९ मधील महिला उद्योजकांचा विशेष सत्कार आणि गौरवही करण्यात आला.