मनसेचा वर्धापन दिन प्रथमच ठाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेचा वर्धापन दिन प्रथमच ठाण्यात
मनसेचा वर्धापन दिन प्रथमच ठाण्यात

मनसेचा वर्धापन दिन प्रथमच ठाण्यात

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. प्रभागांमध्ये विविध उपक्रम राबवत आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशातच दर वर्षी मुंबई साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापनदिन यंदा प्रथमच ठाण्यात साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (ता. ९) होणार असून यासाठी सकाळपासूनच राज ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत.
राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत; तसेच आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून ‘संघर्षाची तयारी... पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट समाजमाध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून प्रसारित केल्या जात होत्या. त्यापाठोपाठ आता सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.