रुग्णालयांमध्ये महिलांचा सन्मान

रुग्णालयांमध्ये महिलांचा सन्मान

मुंबई, ता. ९ ः बोरिवली येथील अपेक्स रुग्णालय समूहात काम करणाऱ्या सर्व परिचारिकांचा विशेष सन्मान करण्यात आला; तसेच या वेळी विभागातील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला. या रुग्णालय समूहात १०० हून अधिक परिचारिका तसेच महिला मदतनीस कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या वेळी गर्भाशयाचा कर्करोग तसेच स्तनाच्या कर्करोगाविषयी माहिती देऊन त्यांचे आरोग्यप्रबोधन करण्यात आले.
झायनोव्हा शाल्बी मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाने खास महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १५० हून अधिक महिलांची तपासणी केली. या तपासणीमध्ये तोंडाचा, गर्भाशयाचा आणि स्तनाचा कर्करोग, थायरॉईड चाचणी, मधुमेह, दंत, पॅप स्मीअर, लिपिड प्रोफाइल, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य यांचा समावेश होता. याशिवाय महिलांसाठी निरोगी जीवनशैली आणि आहार यावर संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात सल्लागार फिजिशियन, र्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ, ब्रेस्ट ऑन्को सर्जन, त्वचारोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक यांनी ४५० हून अधिक मोफत सल्ला दिला.
............................................
शाळेतही महिलांचा सन्मान
खार येथील अनुयोग शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. अनुयोग शिक्षण संस्थेच्या सचिव रोहिणी चिंदरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारती बिर्जे डिग्गीकर सुप्रसिद्ध लेखिका तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रेमा कोटिया, भारती हजारी यांची उपस्थिती लाभली. विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले, समूहनृत्य सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटिका स्वरचित कविता महिला शिक्षिकांचे विविध विषयावरील विचार आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनुयोग शिक्षण संस्थेचे संस्थापक भाई चिंदरकर विभागातील नगरसेविका प्रज्ञा भुतकर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com