रूक्मिणी प्रभुदेसाई यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रूक्मिणी प्रभुदेसाई यांचे निधन
रूक्मिणी प्रभुदेसाई यांचे निधन

रूक्मिणी प्रभुदेसाई यांचे निधन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ९ : डोंबिवलीतील रुक्मिणी प्रभुदेसाई (वय १०१) यांचे गुरुवारी (ता. ९) सकाळी बेंगळुरू येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मिलापनगर येथे राहणाऱ्या रुक्मिणी प्रभुदेसाई यांनी ३ मार्च रोजी वयाची १०१ वर्षे पूर्ण करत आपला वाढदिवस साजरा केला होता. या वयातही त्या आपली कामे स्वतः करत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या आपल्या मुलीकडे बेंगळुरू येथे राहण्यास गेल्या होत्या. तेथे त्यांची प्रकृती खालावली होती. गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर बेंगळुरूमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.