अनाहतचा ‘स्त्री कर्तृत्व सन्मान सोहळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाहतचा ‘स्त्री कर्तृत्व सन्मान सोहळा’
अनाहतचा ‘स्त्री कर्तृत्व सन्मान सोहळा’

अनाहतचा ‘स्त्री कर्तृत्व सन्मान सोहळा’

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः नेहमीच स्त्रियांशी निगडित कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी अग्रेसर असणाऱ्या अनाहत इव्हेन्टसच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही कर्तृत्ववान माहिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा ‘स्त्री कर्तृत्व सन्मान सोहळा’चे तिसरे वर्ष आहे. समाजसेवक नीलेश मुणगेकर यांचे एनएम एन्टरप्रायझेस या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. सचिन वैद्य अनाहतचे क्रिएटिव्ह हेड; तर चटपट फूड्स हे गिफ्टिंग पार्टनर होते. प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे एनएम एन्टरप्रायझेसची प्रस्तुती व अनाहत इव्हेन्टस आयोजित ‘स्त्री कर्तृत्व सन्मान सोहळा’ मोठ्या थाटात संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. या सोहळ्याला प्राध्यापक मीना गोखले, लेखिका मुग्धा गोडबोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण प्रमुख पाहुण्या म्हणून, तर दिग्दर्शक विश्वास जोशी, दिग्दर्शिका सुचिता शब्बीर, माध्यम समन्वयक गणेश गारगोटे विशेष अतिथी म्हणून लाभले. या वेळी शैक्षणिक विभागात हर्षु बेल्लारे, वैद्यकीय विभागात डॉ. अनघा हेरुर, समाजसेवा विभागात अश्विनी ढेंगे, सोनल साटेलकर, वार्तांकन विभागात ऐश्वर्या पेवाल, संशोधन विभागात स्वप्नजा मोहिते, व्यावसायिक विभागात झोया शेख, अभिनय विभागात अभिनेत्री नम्रता प्रधान, विशेष सामाजिक बांधिलकी विभागात प्रीती कदम, लेखिका प्राची गडकरी यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी अनाहतच्या श्वेता वैद्य यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.