कचऱ्याला आग लागल्याने
मध्य रेल्वेच्या वाहतुकीस विलंब

कचऱ्याला आग लागल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीस विलंब

मुंबई, ता. ९ : मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान गुरुवारी (ता. ९) दुपारी २.१५ वाजता रेल्वे रुळांलगत कचऱ्याला आग लागली. आगीच्या धुरामुळे डाऊन मार्गावरील लोकल गाड्यांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती.
कुर्ला-विद्याविहार स्थानकांदरम्यान गुरुवारी दुपारी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गालगत कचऱ्याला अचानक आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे लोट रेल्वे रुळांवर येऊ लागले. ही बाब मोटरमनच्या लक्षात येताच कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल काही अंतरावर थांबवण्यात आली. तसेच त्याबाबत नियंत्रण कक्षास कळवण्यात आले. रेल्वे कर्मचारी, आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेत १० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या आगीमुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com