हॉटेल चालकावर चाकूने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेल चालकावर चाकूने हल्ला
हॉटेल चालकावर चाकूने हल्ला

हॉटेल चालकावर चाकूने हल्ला

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ९ ः चहा-नाश्त्याचे उधारीचे पैसे मागितल्याने संतापलेल्या ग्राहकाने हॉटेल चालकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील गोळवली परिसरात घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मनोजकुमार यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेतील पांडुरंग वाडी परिसरात राजेंद्र प्रसाद यादव यांचे हॉटेल आहे. याच परिसरात राहणारा मनोज कुमार यादव हा राजेंद्र यांच्या हॉटेलवर यायचा आणि उधारीवर चहा-नाश्ता करून जायचा. या उधारीवरून मनोजने राजेंद्र यांच्याशी वाद घालत चाकूने राजेंद्र यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकूने हल्ला केल्यानंतर मनोज याने तेथून पळ काढला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.