Mon, March 27, 2023

नोकरीच्या प्रलोभनाने फसवणूक करणारे अटकेत
नोकरीच्या प्रलोभनाने फसवणूक करणारे अटकेत
Published on : 10 March 2023, 2:49 am
मुंबई, ता. १० : मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या प्रलोभनाने बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला साकीनाका पोलिसांनी नोएडा येथून अटक केली आहे. शिवमकुमार गुप्ता, उदित सिंग, सिद्धार्थ बाजपेयी अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी जानेवारी २०२३ मध्ये साकीनाका परिसरात ‘अग्याता मरिन्स अलाईस शिपमेन्ट’ कंपनीच्या नावे कार्यालय सुरू केले होते. या कंपनीद्वारे मर्चंट नेव्हीत तरुणांना नोकरीचे प्रलोभन दाखवून रोख तसेच बँक खात्यावर पैसे घेतले जात होते. यात एका पीडित तरुणाने कागदपत्रे देऊन पैसेही भरले, मात्र हे तिघेही कार्यालय बंद करून पसार झाले होते. या प्रकरणी साकीनाका पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली. या तिघांनी आतापर्यंत एकूण ४३ लाख रुपयांची फसणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.