दिव्यात रंगला खेळ पैठणीचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यात रंगला खेळ पैठणीचा
दिव्यात रंगला खेळ पैठणीचा

दिव्यात रंगला खेळ पैठणीचा

sakal_logo
By

दिवा, ता. ११ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त भाजपचे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष डॉ. सतीश केळशीकर यांच्या माध्यमातून महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या माई सावर्डेकर, मीनाक्षी केळशिकर, यशस्वी उद्योजिका धनश्री मुकुंदे, दिवा आरपीएफ अधिकारी पूजा नवले, सरिता आरगडे, ठाणे महापौर चषक सुवर्णपदक विजेते कमल बुट्टे, त्याचबरोबर दिवा शहरातील अंगणवाडी कर्मचारी, रिक्षा महिला चालक, घरकाम करणाऱ्या महिला, ज्येष्ठ महिला यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर, सरचिटणीस अक्षय तिवरामकर, ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय भोईर, दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील, रेश्मा पवार, माजी महिला मोर्चा अध्यक्ष सीमा भगत, संगीता भोईर, पोखरण मंडळ सरचिटणीस सपना देवरे, उत्तर भारतीय मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर आदी उपस्थित होते.