वहिवाटीच्या वादांवर ‘सलोख्या’तून तोडगा

वहिवाटीच्या वादांवर ‘सलोख्या’तून तोडगा

Published on

नवीन पनवेल, ता. १२ (वार्ताहर)ः शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपापसातील वाद मिटवण्याबरोबरच समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी पनवेल तालुक्यात सलोखा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंर्तगत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे वर्ग करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
पूर्वीच्या काळात जमिनीचे छोटे सर्व्हे नंबर असायचे. त्यामुळे २-३ गुंठे जमीन होती. पुढे कालांतराने कुटुंब वाढले, जमीन मात्र तितकीच राहिली. यामुळे जमिनीचे तुकडे पडल्याने पीक घेणे कठीण होऊ लागले. या बाबींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने १९४७ साली जमिनींचे एकत्रीकरण आणि तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा आणला. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्षेत्र एकत्र झाले, पण ताब्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले. जमीन एकाच्या नावावर आणि त्या जमिनीवर ताबा दुसऱ्याचा असे प्रकार घडल्याने पुढे वादात रूपांतर होऊ लागले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे ही प्रकरणे आता आपापसात मिटतील, असा विश्वास सरकारला आहे.
------------------------------------------------
योजनेतील महत्त्वाच्या अटी
- सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तावेजासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षांपर्यंत राहणार आहे. या योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असला पाहिजे.
- एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा वस्तुस्थिती दर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहिजे व पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना दिले पाहिजे.
-------------------------------------------------
शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या जमीनधारकांच्या जमीन अदलाबदलीनंतर क्षेत्र ज्याचे त्याचे नावे होतील. शेतजमिनीचा कागदोपत्री ताबा मिळाल्याने शेतकऱ्यांना विहीर, शेततळे, पाइपलाइन, वृक्ष व फळबाग लागवडीबाबत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.
-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल
-------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com