विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : बांगरचोले, तांबडीपाडा आणि केव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त अजिंक्या युवा प्रतिष्ठान आणि महात्मा जोतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी व चष्मेवाटप शिबिर तसेच मुलांचे विविध उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपसभापती तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य नम्रता गोवारी यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून बोरांडाच्या सरपंच पाटील, जयश्री पाडेकर, विलास तांबडी, उद्धव ठाकरे गटाचे विक्रमगड तालुका सचिव नरेश गोवारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक संतोष निमसे, आदेश भोईर, बालु गोटे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर तसेच गौत्तम बनसोड व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नम्रता गोवारी यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.