शिरवलीतील मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरवलीतील मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत
शिरवलीतील मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत

शिरवलीतील मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत

sakal_logo
By

मुरबाड, ता. १३ (बातमीदार) : मानव विकास संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील काकडपाडा शिरवली येथील तारांगण मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. या वेळी मानव विकास संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सुधीर वर्मा, संतोष गायकर, अनंत घागस उपस्थित होते. वर्मा यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांना भविष्यकाळात लागणारी मदत देण्याचेही या वेळी जाहीर केले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय चालणाऱ्या तारांगण मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना समाजसेवी संस्था व व्यक्तींच्या सहकार्यावरच अवलंबून राहावे लागते. समाजातील तळागाळातील आदिवासी दुर्बल पीडित घटकांसाठी तळमळीने काम करणाऱ्या भारतीय मानव विकास संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सुधीर वर्मा यांना या मूकबधिर विद्यालयाबाबत माहिती मिळताच त्यांनी या शाळेस भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ भेट दिले. या वेळी शाळेचे अधीक्षक विकास म्हाडसे व इतर शिक्षकांनी सुधीर वर्मा यांचे आभार मानले.