राज्यव्यापी संपाला ‘ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स’चा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यव्यापी संपाला ‘ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स’चा पाठिंबा
राज्यव्यापी संपाला ‘ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स’चा पाठिंबा

राज्यव्यापी संपाला ‘ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स’चा पाठिंबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १४ : जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणीसाठी १४ मार्चपासून कर्मचारी महासंघाने राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरातील शासकीय कार्यालयांमधील कारभार ठप्प होण्याची शक्यता आहे. या संपाला मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

कामगार जगतातील प्रत्येकाचा सेवानिवृत्तीनंतरच्या जगण्याचा हक्क या संविधानिक मूल्यांमध्ये सामावलेला आहे. संविधानिक मूल्यांना आणि समाजाप्रति असलेल्या संविधानिक आश्वासनांना बाजूला सारून तत्कालीन सरकारांनी असंविधानिक निर्णय घेऊन केंद्र व राज्यांतील कामगार, कर्मचाऱ्यांना मिळत असलेले सेवानिवृत्ती वेतन काढून घेऊन त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या जगण्याच्या हक्कांपासून वंचित केले आहे. राज्य सरकारी, महापालिका, नगरपालिका यातील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सर्व संघटनांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या संपाला संघटनेचा पाठिंबा असल्याचे शशांक राव यांनी सांगितले.