वेहेलपाडा पुलावर संरक्षण भिंत नसल्याने धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेहेलपाडा पुलावर संरक्षण भिंत नसल्याने धोका
वेहेलपाडा पुलावर संरक्षण भिंत नसल्याने धोका

वेहेलपाडा पुलावर संरक्षण भिंत नसल्याने धोका

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा मुख्य रस्त्यावर पूल बांधण्‍यात आला असून, या पुलावर संरक्षक भिंत नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास वाहन पुलाखाली जाण्‍याची शक्‍यता आहे. हा अनर्थ टाळण्यासाठी पुलावर संरक्षक कठडे निर्माण करावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर कठडे नसल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून प्रवास करतात. पूल छोटा असूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या पुलावर आवश्यक कठडे बांधावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. तालुक्यामध्ये असे अनेक पूल असून, ज्या ठिकाणी कठडे बसविण्‍यात आलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून ज्या पुलावर कठडे नाहीत, अशा ठिकाणी कठडे बांधावेत; जेणेकरून अपघाताला आळा बसेल, अशी मागणी करण्‍यात येत आहे. आगामी काळात आवश्यक ठिकाणी रस्ते, कठडे, खड्डे भरण्‍याकडे दुर्लक्ष केल्यास मार्क्सवादी कम्युनिस्‍ट पक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर आंदोलन करेल, असा इशारा माकपचे पालघर जिल्हा सचिव किरण गहला यांनी दिला आहे.