‘हस्तांतरण स्थानकाचे काम अर्थवट’

‘हस्तांतरण स्थानकाचे काम अर्थवट’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचे काम अधिकारी व ठेकेदार करत आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता उभारण्यात आलेले हस्तांतरण स्थानकाचे काम अर्थवट असून त्यावर गेल्या पाच वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे, असा आरोप मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

ठाणे शहरातील वाढती लोकवसाहत लक्षात घेता घनकचऱ्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे, पण त्या करण्याऐवजी भ्रष्टाचारासच अधिक प्राधान्य दिले जात आहे. पाच वर्षे उलटूनही वागळे इस्टेट येथील घनकचरा हस्तांतरण केंद्रातील अनेक कामे प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. हस्तांतरण केंद्रातील संपूर्ण परिसरात संरक्षक भिंत बांधणे आवश्यक असतानाही तसे करण्यात आले नाही. त्याबदल्यात तात्पुरत्या स्वरूपात केवळ काही ठिकाणी पत्रे लावून मलमपट्टी करण्यात आली आहे, असा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे. या घनकचरा हस्तांतरण प्रकल्पामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही यंत्रणादेखील अपुरी आहे. तसेच प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रसाधन गृह, चेंजिंग रूम या सुविधांचीदेखील कमतरता आहे. प्रकल्पाच्या कामकाजाकरिता हक्काचे अत्याधुनिक नियंत्रण कक्ष कार्यालयदेखील या ठिकाणी नाही. वायुप्रदूषण रोखण्यासाठी बफर झोन करणे आवश्यक असतानादेखील हीसुद्धा सुविधा प्रकल्पाच्या ठिकाणी अस्तित्वात नाही, असे महिंद्रकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com