
Mahindra excellence in theatre awards 2023: मराठी विभागातून या नाटकांना नामांकन
Mahindra excellence in theatre awards 2023
नाट्य चळवळीतील मानाचा पुरस्कार समजल्य़ा जाणारा महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्कार यंदा २३ ते २९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. महिंद्रा समूहाने पुढाकार घेतलेल्या या सोहळ्यात यंदा १३ विभागातून १० सर्वोत्तम नाटकांना नामांकन मिळवले आहे. दिल्लीतील दिमाखदार सोहळ्यात ही नाटकं सादर केली जाणार असून या सोहळ्यात रेड कार्पेट हे उपस्थितांचं लक्ष वेधून घेणार आहे. या सोहळ्यात नाट्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.
महिंद्रा आयोजित नाट्यमहोत्सवात यंदा 395 नाटकांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम,मणिपूर आणि राजस्थानमधील नाट्यसंस्थांनी या नाट्यमहोत्सवासाठी अर्ज केले होते. त्यापैकी आसामी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, मारवाडी आणि तमिळ अशा १० भाषांमधील नाटकांची या महोत्सवासाठी निवड झाली.
महिंद्रा आणि महिंद्राचे उपाध्यक्ष जय शहा यांनी या नाट्यमहोत्सवाबाबत बोलताना म्हटले की, “महिंद्रा समूहाने वैविध्यता आणि सर्वसमावेशकता हे उद्दीष्ट कायम डोळ्यासमोर ठेवले आहे.
मराठी विभागातून या नाटकांना नामांकन
मराठी विभागातून भूषण कोरगांवकर दिग्दर्शित आणि 'बी स्पॉट' निर्मित ‘लावणी के रंग’ आणि व्हाया सावरगाव खुर्द हे सुयोग देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेले आणि आसक्त कलामंच यांनी निर्मित केलेले नाटक नामांकीत करण्यात आले आहे. लावणी के रंग हे नाटक 1 तास आणि 30 मिनिटांचे आहे तर व्हाया सावरगाव खुर्द 1 तास 36 मिनिटांचे आहे.
समितीत कोण होते?
नाट्यपुरस्कारांसाठीच्या निवड समितीने नामांकने जाहीर करण्यापूर्वी एकूण 395 नाटके पाहिली. या समितीमध्ये लेखक आणि सीगल बुक्सचे माजी मुख्य संपादक अंजुम कात्याल, अभिनेते, दिग्दर्शक केवल अरोरा,प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी नाट्य दिग्दर्शक शंकर वेंकटेश्वरन आणि नाट्यसमीक्षक विक्रम फुकान यांचा समावेश होता.
नीना कुलकर्णी काय म्हणाल्या?
या स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि खासकरून ईशान्येकडील राज्यातून नाटके आली होती. देशातील कानाकोपऱ्यातून आलेले नाट्यविष्कार पाहणं आनंददायी वाटले. आपल्या देशातील नाटके ही देशाप्रमाणेच वैविध्यतापूर्ण आहेत. यावर्षी या नाट्यमहोत्सवाचे उद्दीष्टं हे देशाची वैविध्यता आणि समावेशकता दाखवणे हे होते. त्यामुळे विविध राज्यांतून आलेली नाटके पाहताना छान वाटत होते. ऐतिहासिक, पौराणिक, प्रयोगात्मक, महिला सक्षमीकरण, विनोदी धाटणीची नाटके पाहायला मिळाली.