कासात कचऱ्याची समस्या गंभीर

कासात कचऱ्याची समस्या गंभीर

कासा, ता. १४ (बातमीदार) : कासा ग्रामपंचायतीमध्ये सध्या कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. कासा गाव परिसरात सध्या कचऱ्याचे ढीग दिसत असून मोकाट गुरे, कुत्रे कचऱ्यावर फिरून दुर्गंधी पसरवत आहेत. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डहाणू-नाशिक मुख्य रस्त्याजवळ सायवन नाका येथे चिकन, मटन दुकाने असून अनेक भाजीपाला विक्रेतेदेखील रस्त्यालगत कचरा टाकत आहेत. कापलेल्या कोंबड्यांची पिसे, मासे, मटन, चिकन यामधील टाकाऊ घटक तेथे टाकल्याने दुर्गंधी पसरत आहे. वारा सुटल्यानंतर ही पिसे रस्त्यावर येत असतात. ही सर्व दुकाने मुख्य रस्त्यावर असल्यामुळे अनेक नागरिक प्रवास करीत असतात. शिवाय पुढे शाळा असल्याने विद्यार्थी ये-जा करत असतात. त्याचप्रमाणे जवळच रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे हा कचरा हटवावा किंवा तेथील दुकानदारांना सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

----------------
कासा ग्रामपंचायतीच्या वतीने येथील भाजीपाला, चिकन, कोबडी, मटन विक्रेते यांना सूचना केली आहे. तेथील कचरा एकत्र करण्यासाठी कचराकुंड्या ठेवल्या आहेत. गावातील कचरा उचलण्यासाठी कचरा गाडी फिरत असते. कामगारांना सूचना केल्या आहेत.
- मोहन पाचलकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कासा

------------------
कासा ग्रामपंचायतीमध्ये कचरा उचलण्यासाठी दोन गाड्या असून कर्मचाऱ्यांनी नियमित कचरा उचलल्यास कचऱ्याची समस्या सुटू शकते. गावामधील अनेक ठिकाणी कचरा साठलेला असतो. शिवमंदिराच्या पाठीदेखील मोठ्या प्रमाणात कचरा जमा असतो. तो नेहमी उचलला गेला पाहिजे. या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात.
- विपुल राऊत, ग्रामस्थ कासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com