कामोठेत लाखोंच्या दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामोठेत लाखोंच्या दागिन्यांची चोरी
कामोठेत लाखोंच्या दागिन्यांची चोरी

कामोठेत लाखोंच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

पनवेल, ता. १६ (वार्ताहर) : कामोठे, सेक्टर- ३६ मध्ये सोनसाळखी चोरांनी पोलिस पत्नी असलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील तब्बल एक लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. कामोठे पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कामोठे सेक्टर-३५ मध्ये राहणाऱ्या तक्रारदार बीएमसीच्या शाळेत शिक्षिका आहेत; तर त्यांचे पती हे मुंबई पोलिस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी ६ वाजता पतीसह मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असताना सकाळी ७ च्या सुमारास सेक्टर- ३६ मधील भूमी टॉवर इमारतीजवळ दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने शिक्षिकेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून शिवसेना चौकाच्या दिशेने पसार झाले आहेत. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.