मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेलदरम्यान हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 
---------
कुठे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी-  सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा योग्य डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.
--------
कुठे- कुर्ला येथे पादचारी पुलाच्या प्लेट गर्डर्स लाँच करण्यासाठी शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कधी- रात्री ११.५० ते ४. २० (४ वाजून ३० मिनिटे) अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावर
परिणाम- वडाळा रोड ते मानखुर्द या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वे १४० टी रेल्वे क्रेन वापरून कुर्ला स्थानकावर ८ मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्डर सुरू करण्यासाठी अप जलद मार्गावर आणि डाऊन हार्बर मार्गावर रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध होणार नाहीत; तर डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची पनवेल लोकल ही सीएसएमटीवरून रात्री ११.१४  वाजता सुटणार आहे. अप हार्बर मार्गावरील शेवटची पनवेल लोकल ही वडाळा रोडवरून रात्री ११.८ वाजता सुटेल.
------------
पच्छिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक
रविवार, १९ मार्च रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
कुठे- वसई रोड आणि भाईंदर स्टेशनदरम्यान
कधी- शनिवारी १८ मार्च आणि रविवारी १९ मार्चच्या मध्यरात्री ११.३० ते मध्यरात्री ३.३० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर.
परिणाम- यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल विरार, भाईंदर आणि बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरील धावतील, ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही उपनगरीय फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
----------
मेल-एक्स्प्रेस गाड्यांना फटका 
कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, मंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस या गाड्या मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि या निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com