नुतन गुळगुळे यांना स्व. सुषमा स्वराज पुरस्कार

नुतन गुळगुळे यांना स्व. सुषमा स्वराज पुरस्कार

विरार, ता. १८ (बातमीदार) : सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दिव्यांगांच्या सेवेत स्वतःला झोकून देत राष्ट्रीय पातळीवर अविरत कार्यरत असलेल्या नूतन विनायक गुळगुळे यांचा त्यांच्या या भरीव कार्यानिमित्त नुकताच ‘स्व. सुषमा स्वराज पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महिला मोर्चा वसई-विरार शहर जिल्हा यांच्या वतीने नुकताच नालासोपारा येथे या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्व. सुषमा स्वराज पुरस्कार स्वीकारताना नूतन विनायक गुळगुळे म्हणाल्या, अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू स्व. सुषमा स्वराज यांच्या नावे मिळालेला पुरस्कार मला प्रेरणादाई असून, सुषमाजींनी अंगीकारलेली मूल्ये आणि आदर्श यांची जाणीव करून देत राहील. स्वानुभवातून सुरू झालेले माझे दिव्यांग सेवेचे व्रत कितीही अडथळे आले तरी अखंड सुरू ठेवण्यासाठी प्राणवायू ठरेल. ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’चे ‘स्वानंद सेवा सदन’ हे कोरोनामुळे पालक गमावलेल्या दिव्यांग बालकांकरिता आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील पहिले वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र अर्नाळा गावात उभारण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com