‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज’चा संपाला पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज’चा संपाला पाठिंबा
‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज’चा संपाला पाठिंबा

‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज’चा संपाला पाठिंबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने ‘महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन’ने पाठिंबा जाहीर केला आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही कर्मचाऱ्यांच्या लढ्यात सहभागी होऊ, असे संघटनेने म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे भारत हे कल्याणकारी राष्ट्र आहे आणि पेन्शनच्या स्वरूपात सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ज्यातून या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही आयुष्यात एक स्थैर्य आणि सुरक्षितता उपलब्ध होईल, हे लक्षात घेता सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता जबाबदारीच्या भूमिकेतून ही मागणी त्वरित मान्य करावी, असे आवाहन संघटनेतर्फे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना करण्यात आले आहे.

पेन्शनसाठी निधी उभा करा
पेन्शनला आवश्यक निधी उभा करण्यासाठी सरकारकडे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पेन्शनच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पैसा हा शेवटी बाजारातच खेळणार आहे, ज्यातून सरकारचे करसंकलन वाढेल. म्हणजेच उत्पन्नात लक्षणीय भर पडेल. यामुळे कर्मचान्यांमध्ये जे स्थैर्य, सुरक्षितता येईल त्यातून प्रोत्साहित होऊन कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल याचीही सरकारने नोंद घ्यायला हवी, असे संघटनेचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.