रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते भाई सावंत यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते भाई सावंत यांचे निधन
रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते भाई सावंत यांचे निधन

रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते भाई सावंत यांचे निधन

sakal_logo
By

तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे खंदे समर्थक, ज्येष्ठ नेते, विचारवंत, साहित्यिक, कुशल संघटक अशा विविध ख्याती प्राप्त असलेले उत्तर भारत प्रभारी भगवान (भाई) सावंत यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी नेरूळ येथील राहत्या घरी रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मुंबई महालक्ष्मी येथील सेंट्रल रेल्वेची सेवा करून तीन वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. नेरूळ सेक्टर १८ येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुलगे, दोन सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सेक्टर दोन येथील स्मशानभूमीत‌ त्यांचा अंत्यविधी पार पडला.