डोंबिवलीत आढळला सर्वात महागडा साप

डोंबिवलीत आढळला सर्वात महागडा साप

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : सर्वांत महागडा साप म्हणून ओळख असणारा आणि छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात तस्करी होणारा डुरक्या घोणस डोंबिवली ग्रामीण भागात आढळून आला आहे. नेकणीपाडा येथील एका गॅरेजमध्ये हा साप असल्याची माहिती पॉजचे संस्थापक नीलेश भणगे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन या सापाला जीवनदान दिले. डुरक्या घोणस हा साधारण एक महिन्याचे पिल्लू आहे. त्याने भक्ष्य खाल्लेले असल्याने तो त्या ठिकाणी शांत पडून होता. त्याला पुन्हा मलंगगड पट्ट्यातील अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याचेदेखील भणगे यांनी सांगितले. डुरक्या घोणस हा साप घरात आल्याने मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो, अशी अंधश्रद्धा असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. सर्वांत महागडा साप म्हणून त्याला ओळखले जाते. रेताड जमीन, माळरान, जंगल, नागरी वस्ती, दगडांच्या सापडीत, जमिनीखाली त्यांचे वास्तव्य असते. ईशान्य भारत वगळता सर्वत्र हा डुरक्या घोणस आढळून येतो, अशी माहिती प्राणीमित्रांनी या वेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com