वाशीनाका येथील मार्ग चिखलमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीनाका येथील मार्ग चिखलमय
वाशीनाका येथील मार्ग चिखलमय

वाशीनाका येथील मार्ग चिखलमय

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः चेंबूर येथील वाशीनाका परिसरातील नागाबाबा नगरजवळील मार्ग चिखलमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून चालताना वाहनचालकांना व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लवकरात लवकर या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

वाशीनाका परिसरात नागाबाबा नगर, आरएनए पार्क एमएमआरडीए कॉलनी, एमएमआरडीए वसाहत असल्याने या परिवारात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. नागाबाबा नगर तसेच ईस्टर्न एक्सप्रेस ब्रिजजवळील मार्ग सध्या चिखलमय झाला आहे. या मार्गावरून नागरिक व वाहनांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लहान मुले, शाळेतील मुले, गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिक कित्येकदा जखमी झाले आहेत. या मार्गावर वाहने जाताना नागरिकांच्या कपड्यावर चिखल उडतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग पालिकेने नव्याने तयार करावा किंवा मार्ग चिखलमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.