बतावणी करून महिलेला लुबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बतावणी करून महिलेला लुबाडले
बतावणी करून महिलेला लुबाडले

बतावणी करून महिलेला लुबाडले

sakal_logo
By

पनवेल (वार्ताहर) : बतावणी करून ज्येष्ठ नागरिक, महिलांना लुबाडणाऱ्या दोघा भामट्यांनी कामोठे भागात राहणाऱ्या एका ६७ वर्षीय वृद्धेजवळचे एक लाखांचे दागिने लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
कामोठे, सेक्टर-१७ मध्ये मुलगा व मुलीसोबत राहत असलेल्या सुजाता मोरे सोमवारी दुपारी पायी चालत सेक्टर-३४ मध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मुलाच्या घरी जात होत्या. या वेळी कामोठे ब्रिज ते मानसरोवर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पदपथावरून जात असताना एका भामट्याने मोफत वस्तुवाटप होत असल्याचे सांगून मोरे यांना भुरसार बिल्डिंगच्या खाली पायरीवर नेऊन बसवले. तसेच त्यांच्या हातात एक कापडी पिशवी दिली. काही वेळातच त्या ठिकाणी आणखी एक भामटा आल्यानंतर या दोघांनी सुजाता मोरे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील २ तोळे वजनाच्या बांगड्या काढून पलायन केले.