Wed, June 7, 2023

धडकेत एकाचा मृत्यू
धडकेत एकाचा मृत्यू
Published on : 23 March 2023, 10:58 am
कासा, ता. २३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा सायवन मार्गावर बुधवारी रात्री एका भरधाव अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडल्याची घटना घडली. या अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासा सायवन राज्यमार्गावर बुधवारी रात्री कब्रस्तानाजवळ अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असताना मितेश गंगाराम जाधव (३८, रा. कासा नारायण पाडा) यास जोरदार धडक दिली. या धडकेत मितेश गंभीर जखमी झाला. तेथील नागरिकांनी त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबतीत कासा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रस्त्याजवळ असलेल्या एका दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा तपास लागेल, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.