मेढी येथे खैर झाडांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेढी येथे खैर झाडांची चोरी
मेढी येथे खैर झाडांची चोरी

मेढी येथे खैर झाडांची चोरी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील कुंज, मेढी, वेहेलपाडा आदी भागात मोठ्या प्रमाणात साग आणि खैर जातीची झाडे आहेत. पण खैर झाडाला बाजार भाव चांगला असल्याने चोरटे रात्री अंधाराचा फायदा घेऊन खैराची तोड करून पसारा होतात. विक्रमगड मधील मेढी येथील डॉ.सुरेश लहांगे व चिंतामण लहांगे यांच्या मालगी जागेतून चोरट्यानी काही दिवसांपूर्वी १६ मोठ्या खैर तोडून नेले आहेत. दुसऱ्या दिवशी जमीन मालक हे शेतावर गेल्या नंतर त्यांच्या खैर चोरट्यानी तोडून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वनविभाग यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षापूर्वीही त्यांच्या जागेतील खैराची चोरी गावाकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडली गेली होती. मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. परंतु त्यावेळी लाखो रुपयांचे खैर हे वनविभागाने आपल्या ताब्यात घेऊन केवळ जमीन मालक यांना खैरांची तुटपुंजी रोख रक्कम दिली होती, अशा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला होता.