‘उत्पादन शुल्क’ने मद्यतस्करी रोखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उत्पादन शुल्क’ने मद्यतस्करी रोखली
‘उत्पादन शुल्क’ने मद्यतस्करी रोखली

‘उत्पादन शुल्क’ने मद्यतस्करी रोखली

sakal_logo
By

मनोर, ता. २३ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी तालुक्यातील वेवजी-काटेलपाडा रस्त्यावर सापळा रचून केलेल्या कारवाईत दमण बनावटीची दारू तस्करी रोखली आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या टेम्पोमधून विविध ब्रॅण्डची विदेशी दारू आणि बिअरचा १५२ बॉक्समध्ये १५९९ बल्क लिटर दारूसाठा मिळून १७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केंद्रशासित प्रदेशातून होणारी मद्यतस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून तलासरी आणि घोलवड भागात गस्त घातली जात आहे. तलासरी तालुक्यातील वेवजी-काटेलपाडा रस्त्यावरून टेम्पोमधून दमण बनावटीच्या मद्याची तस्करी केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार घोलवड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वेवजी गावाच्या हद्दीत बेवजी-काटेलपाडा रस्त्यावर सापळा रचला होता. सायंकाळी रस्त्यावरून जात असलेल्या पिकअप टेम्पोचा संशय आल्याने चालकाला थांबण्याचा इशारा केला. तेव्हा चालकाने टेम्पोचा वेग वाढवून पळून गेला होता. त्यानंतर भरारी पथकाने टेम्पोचा पाठलाग सुरू केला. टेम्पोचालकाने कच्च्या रस्त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण काही अंतरावर रस्ता संपल्याने टेम्पो सोडून टेम्पोचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये दमण बनावटीचा साठा आढळून आला. यामध्ये विविध ब्रॅण्डची विदेशी दारू आणि बिअरचे १५२ बॉक्समध्ये १५९९ बल्क लिटर दारूसाठा आणि टेम्पो मिळून १७ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर, निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक उदय शिंदे आणि पथकातील जवानांनी केली आहे. कारवाईदरम्यान उत्पादन शुल्क विभागाचे डहाणू विभाग आणि दापचरी सीमा तपासणी नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली.
...
टेम्पोचालक फरार
पिकअप टेम्पोची बारकाईने तपासणी केली असता टेम्पोमधील कागदपत्रांनुसार टेम्पोच्या चालकाचे नाव रमेश डोलारे असल्याचे आढळून आले. टेम्पोचालक पळून गेल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले असून चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.