तिन्ही मार्गावर
रविवारी मेगाब्लॉक

तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई, ता. २४ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २६) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते जोगेश्वरी पाचव्या मार्गिकेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
.......
मध्य रेल्वे
कुठे ः ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी ः सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
-------------
हार्बर रेल्वे
कुठे ः कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी ः सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर आणि वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. वाशी, बेलापूर पनवेल येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ मार्गावरील ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.
---
पश्चिम रेल्वे
कुठे ः जोगेश्वरी ते बोरिवली पाचव्या मार्गिकांवर
कधी ः सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम ः ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. या ब्लॉकमुळे २५ मार्च २०२३ रोजी अहमदाबादहून सुटणारी ट्रेन क्रमांक १९४१८ अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस विरार येथे समाप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com