अलिबागला काँग्रेसची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागला काँग्रेसची निदर्शने
अलिबागला काँग्रेसची निदर्शने

अलिबागला काँग्रेसची निदर्शने

sakal_logo
By

अलिबाग, ता. २५ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत निदर्शने केली. या वेळी अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. प्रवीण ठाकूर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, तालुका अध्यक्ष भास्करराव चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष योगेश मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना ॲड. प्रवीण ठाकूर म्हणाले, की राहुल गांधी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध व्यक्त करीत आहोत. लोकशाहीप्रधान देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचे काम भाजप व मोदी सरकार करित आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न होत आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अधिक ताकदीने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात लढा उभारणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.