जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग संचवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग संचवाटप
जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग संचवाटप

जिल्हा परिषद शाळांना ई-लर्निंग संचवाटप

sakal_logo
By

वसई, ता. २७ (बातमीदार) : लायन्स क्लब ऑफ वसई युनिक व लायन्स क्लब ऑफ दहिसर यांच्यातर्फे सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या २८ लाखांच्या निधीतून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांना ई-लर्निंगचे संच देण्यात आले. वसई पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहमतीने ही योजना दोन टप्प्यांत राबविण्यात आली. त्यापैकी नोव्हेंबर २०२२ मध्ये ५० जिल्हा परिषद शाळांना, तर २५ मार्च रोजी उर्वरित ५० जिल्हा परिषद शाळांमध्ये ई-लर्निंग किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये ४३ इंची स्मार्ट टीव्ही, यूपीएस, राज्य शासनाच्या अभ्यासक्रमाचा पेनड्राईव्ह, की-बोर्ड, माऊस आणि रिमोट कंट्रोल आदींचा समावेश आहे. वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, वज्रेश्वरी, बोईसर, तलासरी इ. ठिकाणच्या शाळांचा यात समावेश असून हा कार्यक्रम वसईच्या जी. जी. महाविद्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन हनुमंत भोसले आणि डॉ. प्रवीण छाजेड यांनी केले.