आनंदाचा शिधावाटप किटचे अंबरनाथला आमदार डॉ. किणीकर यांच्या हस्ते वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाचा शिधावाटप किटचे अंबरनाथला आमदार डॉ. किणीकर यांच्या हस्ते वाटप
आनंदाचा शिधावाटप किटचे अंबरनाथला आमदार डॉ. किणीकर यांच्या हस्ते वाटप

आनंदाचा शिधावाटप किटचे अंबरनाथला आमदार डॉ. किणीकर यांच्या हस्ते वाटप

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २७ (बातमीदार) : राज्य शासनाच्या आनंदाचा शिधा किटचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते अंबरनाथ येथे लाभार्थींना वाटप करण्यात आले. राज्यातील सर्वसामान्य जनतेला हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करता यावी, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्षिक उत्पन्न ५९ हजारांहून कमी असणाऱ्या लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधावाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या किटमध्ये प्रत्येकी एक किलो साखर, चणाडाळ आणि एक लिटर खाद्यतेल अवघ्या १०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आनंदाचा शिधा किट वाटपाची सुरुवात आमदार डॉ. किणीकर यांच्या हस्ते अंबरनाथ पूर्व भागातील बारकूपाडा आणि कैलाश कॉलनी परिसरातील शिधावाटप दुकानामधून करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे उपशहरप्रमुख परशुराम पाटील, माजी नगरसेवक रवींद्र पाटील, विकास पाटील, युवासेनेचे युवराज पाटील, उपविभागप्रमुख अशोक दवणे, शाखाप्रमुख राजू पाटील, शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुटे आणि शिधावाटप विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने लाभार्थी शिधापत्रिकाधारक उपस्थित होते.