कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीला अटक
कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीला अटक

कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीला अटक

sakal_logo
By

भिवंडी (बातमीदार) : कंपनीत काम करत असताना ट्रॉलीचा धक्का लागल्याने कामगाराने लोखंडी हॉकीबेंडचा फटका मारल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगाराची हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपीला भिवंडी तालुका पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली. शफाउद्दीन राहत हुसेन (वय ३१) हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीत असलेल्या माल्टा कंपनीत काम करीत होता. रविवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे मोहंमद हनीफ इस्माईल (वय २४) आणि शफाउद्दीन कंपनीत काम होते. एका ट्रॉलीमध्ये साहित्य टाकून नेत असताना अचानक मोहंमद हनीफ याला ट्रॉलीचा धक्का लागला होता. यावरून दोघात वाद होऊन मोहंमद हनीफ याने कंपनीतील लोखंडी हॉकीबेंडच्या पाईपने शफाउद्दीनला जोरात फटका मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन शफाउद्दीन मरण पावला. त्यानंतर मोहंमद घटनास्थळावरून पसार झाला होता. तो उत्तर प्रदेशमध्ये पळून जाण्यासाठी कल्याण येथे गेला होता. पोलिस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून त्याला अटक केली. भिवंडी न्यायालयात आज (ता. २७) हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.