मुंब्रा बाह्यवळण रस्ता बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंब्रा बाह्यवळण रस्ता बंद
मुंब्रा बाह्यवळण रस्ता बंद

मुंब्रा बाह्यवळण रस्ता बंद

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २९ (वार्ताहर)ः मुंब्रा-कौसा बाह्य वळण रस्त्यावरील पुलाची सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच एमएसआरडीसीकडून दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी वाहतूक १ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, नाशिक, गुजरात व उत्तरेकडील राज्यांत होणारी मालाची वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कळवा येथील खारेगाव पूल, तसेच कापूरबावडी येथील साकेत पुलाच्या दुरुस्ती कामासाठी रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे. न्हावा-शेवा बंदर, तळोजा औद्योगिक वसाहत, पाताळगंगा औद्योगिक वसाहत येथून मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण केली जाते. येथील बंदर व औद्योगिक वसाहतीमधून ठाणे, भिवंडी, नाशिक, गुजरात व उत्तरेकडील राज्यांत मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण केली जाते. या वाहतुकीसाठी मुंब्रा बाह्य वळण रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, पण एक एप्रिलपासून हा रस्ता बंद करण्यात येणार असल्याने या वाहतुकीचा ताण कळंबोली सर्कलसह सायन-पनवेल महामार्गावर व ठाणे-बेलापूर मार्गावर येणार आहे.
-----------------------------------
पर्यायी मार्गाचा वापर करा
मुंब्रा बायपास बंद होणार असल्यामुळे पनवेल-मुंब्रा मार्गावर वाहतूक कोंडी होणार आहे. तरी वाहतूक प्रशासनाने या मार्गावरून येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या मोटर वाहन चालकांविरोधात मोटर वाहन कायदा १९८८ कलम १७९(१) अन्वये कारवाईचे संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.
---------------------------------------
कोट बाकी आहे...

-तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक