डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवालामुक्त

डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवालामुक्त

कल्याण, ता. २९ (बातमीदार) ः डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनी परिसर मोकळा करावा, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी (ता.२८) पोस्टरद्वारे दिला होता. त्याचा परिणाम म्हणून आज (ता. २९) स्थानक परिसरातील सर्व फेरीवाल्यांनी परिसर सोडला होता. राजू पाटील यांनी वाहतूक पोलिस आणि रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत परिसराची पाहणी केली. तेव्हा परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.

रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी कारवाई करून परिसर पंधरा दिवसांत फेरीवालामुक्त करावा, अशी मागणी मनसेच्या वतीने प्रशासनाकडून करण्यात आली होती. पण पंधरा दिवसांतही कारवाई न झाल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोस्टर लावून फेरीवाले आणि प्रशासनाला इशारा दिला. यात ‘स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली. आता आमच्याकडे दुर्लक्ष करा’ असे लिहिले होते.

त्यानंतर बुधवारी राजू पाटील यांनी पोलिसांसोबत स्थानक परिसराची पाहणी केली. तेव्हा परिसरात एकही फेरीवाला दिसला नाही. आज कोणतेही पथक, पोलिस न घेता रस्ते मोकळे झाले, तर रोज असे चित्र का दिसत नाही, असा प्रश्न राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com